चित्रकलेतून सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांना वाचा
चित्रकलेतून सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांना वाचा
धायरीगाव येथे भव्य चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी) :
धायरीगाव परिसरातील विद्यार्थ्यांमधील कला गुणांना व सामाजिक जाणीवेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता ७ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर आधारित चित्रांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा मुख्य विषय “प्रभागातील कोणत्याही सामाजिक व पर्यावरण समस्यांवर उपाय” तसेच “आपल्या परिसरातील प्रसिद्ध अथवा ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे” असा ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे १८ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकास १०,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ३,००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजता आयोजित करण्यात येणार असून हा कार्यक्रम निर्मल मल्टीपर्पज हॉल, हायस्कूल सोसायटीजवळ, धायरी चौक रोड, धायरीगाव, पुणे-४१ येथे पार पडणार आहे.
या उपक्रमास पुणे शहर व परिसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सामाजिक, राजकीय व महिला नेतृत्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन रुपेश दमिष्टे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९९२१७५६७५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारी व समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही चित्रकला स्पर्धा निश्चितच परिसरातील कला रसिकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

