नागरिकांच्या प्रमुख सूचना व मागण्या : प्रभाग क्रमांक ३३

नागरिकांच्या प्रमुख सूचना व मागण्या : प्रभाग क्रमांक ३३

पुणे | प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३३ मधील सजग नागरिक, मतदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सूचना व मागण्या जाहीर करण्यात आल्या. विकासाची दिशा स्पष्ट करणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींना थेट जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या सूचना व मागण्या नागरिकांच्या अपेक्षांचा ठोस आराखडा मांडतात.

या दस्तऐवजात प्रभागातील दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकास यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. “ तुमचं मत… तुमचं वर्चस्व! ” या ब्रीदवाक्यासह नागरिकांनी उमेदवारांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, निवडणूक जिंकणे हे अंतिम ध्येय नसून निवडणुकीनंतरची कामगिरी  महत्त्वाची आहे.

नागरिकांच्या प्रमुख सूचना व मागण्या :

  • PMRDA की PMC हे प्रकरण तातडीने मिटविणे :
    पुणे मनपा मध्ये समाविष्ट गावांमध्ये अद्याप PMRDA की PMC असा अधिकार गोंधळ असून नागरिकांचे विनाकारण हेलपाटे होत आहेत.

  • मनपा कर रचना :
    समाविष्ट गावांच्या टॅक्स रचनेत बदल करून नवीन टॅक्स बिले मनपा कधी देणार? निवडणूक काळातील घोषणा न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार?

  • अनधिकृत बांधकामे आणि मनपाचा कर :
    सदर बांधकामांबाबत सुसूत्र व कमी खर्चिक नियमावली तयार करावी. परवानगी प्रक्रियेतील किचकट व वेळखाऊ पद्धतीत सुधारणा करावी.

  • नांदोशी व वांजळेवाडी पाणी समस्या :
    ग्रामपंचायत काळात नियमित असलेला पाणीपुरवठा मनपेत आल्यानंतर अशुद्ध व दिवसाआड झाला आहे. शुद्ध व नियमित पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा.

  • खडकवासला धरणाच्या सांडव्याचे क्षेत्र वाढविणे :
    सांडव्याचे क्षेत्र नांदेडपर्यंत वाढवून फुगवटा टाळावा व पर्यटन विकासाला चालना द्यावी.

  • रस्त्यांवर CCTV कॅमेरे चे नियोजन करणे :
    ग्रामपंचायत काळातील CCTV कॅमेरे बंद आहेत. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर तातडीने CCTV प्रणाली कार्यान्वित करावी.

  • उत्तमनगर आणि खडकवासला भाजीमंडई :
    ग्रामपंचायत काळात सुरू असलेल्या भाजी मंडई तात्काळ सुरू कराव्यात.

  • खडकवासला चौपाटी येथील रस्ता रुंदीकरण तसेच पार्किंग ची सोय :
    डोंगर उतार कट करून रस्ता रुंदीकरण शक्य असून, शासकीय जागेवर पार्किंगची सोय करावी.

  • नांदेड ते खडकवासला मुख्य रस्त्यावरील फुटपाथ :
    पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.

  • किरकटवाडी ओढा पूल ते खडकवासला–आंबेगाव फाटा या मार्गावर डिव्हायडर लावणे :
    उपलब्ध रस्त्यावर डिव्हायडर बसवून ट्रॅफिक जॅम टाळावा.

  • DP नियोजनातील सर्वसमावेशकता :
    DP नियोजनात नागरिकांचा सहभाग घेऊन हरकती कमी होतील असे नियोजन करावे.

  • CWPRS, PWD, पाटबंधारे विभागाच्या जागांचा DP मध्ये समावेश :
    शासकीय जागांचा सार्वजनिक उपयोगासाठी नियोजनबद्ध समावेश करावा.

  • CSR अंतर्गत परिसरातील सुरक्षाभिमुखीकरण :
    सिंहगड व खडकवासला परिसरात CSR अंतर्गत सुरक्षा उपाययोजना कराव्यात.

  • धोकादायक वाहतूक नियोजन :
    नांदोशी , किरकटवाडी, वांजळवाडी भागातील धोकादायक वाहतुकीवर नियंत्रण आणावे.

  • ZP हद्दीतील सुविधा मनपाकडे हस्तांतरित करणे :
    समाविष्ट भागातील रुग्णालये व सुविधा मनपाकडे देऊन सुधारणा कराव्यात.

  • मोकळ्या जागांचे संरक्षण :
    मोकळ्या जागांवर रस्ते, उद्याने विकसित करावीत.

  • मनपा अधिकारी मोहल्ला मीटिंग :
    मोहल्ला मीटिंग्सची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही.

  • मनपा अधिकारी आणि नागरिक भेटीची वेळ :
    अधिकाऱ्यांच्या भेटीच्या ठराविक वेळेत ते उपलब्ध नसतात.

  • Water Sprinkler Vehicle :
    किरकटवाडी–नांदशी परिसरात धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी गाड्या फिरवाव्यात.

  • रिंग रोड अंतर्गत भागाशी जोडणारे रस्ते :
    रिंग रोडशी जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे काम तातडीने सुरू करावे.

  • प्रस्तावित रस्त्यांमुळे रखडलेली कामे :
    केवळ प्रस्तावित रस्त्यांमुळे बांधकाम परवानग्या थांबवू नयेत.

  • मनपाकडील कामांबाबत पारदर्शकता :
    प्रत्येक कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावावेत.

  • मुळा–मुठा जलशुद्धीकरण योजना :
    नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस व प्रभावी अंमलबजावणी करावी.

नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले की, लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर न थांबता या सूचना व मागण्यांना लेखी मान्यता देऊन ठरावीक कालमर्यादेत अंमलात आणावे. “लोकप्रतिनिधी हे नागरिकांचे सेवक आहेत,” असा ठाम संदेश देत, विकास हा सर्वसमावेशक आणि टिकाऊ असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या नागरिकांच्या सूचना व मागण्यांमुळे प्रभाग ३३ मधील निवडणूक लढत अधिक मुद्देसूद होण्याची शक्यता असून, उमेदवारांची खरी कसोटी आता त्यांच्या कृतीतूनच होणार आहे.

नागरिकांना आवाहन आहे कि , तुमचे मत व समस्या Comment * मध्ये मांडू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *